सुश्री आरूशी दाते
तो फक्त प्राजक्त होता…
(प्रस्तुत है सुश्री आरूशी दाते जी की एक शाश्वत प्रेम पर भावप्रवण कविता।)
तुझी वाट पाहिली त्याने ,
ओघळला पण,
आवाज न करता,
रोजच्यासारखा.
फरक एवढाच होता,
ओघळण्याचं दुःख नसलं तरी,
तुझ्या ओंजळीचा आधार नव्हता.
श्वासऋतूंना बहरताना,
स्पर्शगंधाची बोचरी उणीव घेऊन,
निरागस आर्त भाव नव्हता.
कळेल का तुला कधी,
समर्पणातील समाधान,
ज्यात तुझा माझा भेद नव्हता.
हृदयस्थ प्रेमाने सुगंधित,
तुझ्या वाटेवर पायदळी जाताना,
तो फक्त प्राजक्त होता.
© आरुशी दाते
वाह खुब छान