सौ. मनिषा रायजादे- पाटील
अल्प परिचय
शिक्षण: एम.ए, डी एड्,बी एड् ,डी एस एम
व्यवसाय: प्राथमिक शिक्षिका
- अनेक कवितासंग्रहातून, दिवाळी अंकातून ,वर्तमानपत्रातून कविता प्रकाशित
- अनेक राज्यस्तरीय संमेलनामध्ये सहभाग
- अनेक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे.
- 2019 मध्ये माझी डी. एड् . विधार्थिनीचा मेळावाची स्मरणिकेची संपादिका म्हणून निवड.
- माय टीव्ही वर आतापर्यंत 3 वेळा मुलाखत व आकाशवाणी सांगली केंद्रावर मुलाखत व कविता वाचन .
? काव्यमनीषा कवितासंग्रह प्रकाशित ?
निवड-
- काव्यप्रेमी शिक्षक मंच जिल्ह्यासचिव
- काव्यप्रेमी गझल मंच राज्यकार्यकारणी सभासद
- आम्ही विश्वलेखिका सांगली जिल्ह्याअध्यक्षा
- जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद तालुका शहर अध्यक्षा
- अ .भा .क . क्रीडा मंच तालुका अध्यक्षा
- शब्दवैभव साहित्य मंच सांगली उपाध्यक्षा
पुरस्कार-
- कस्तुरबा गौरव पुरस्कार- लठ्ठे – एज्युकेशन सोसायटी सांगली
- आदर्श अध्यापिका पुरस्कार – प्रतिष्ठा फाऊंडेशन चिंचणी
- राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार- हिरकणी बहुउद्देशीय संस्था जालना.
- नॅशनल युनिटी अवॉर्ड- आदर्श फौंडेशन संस्था, पेठ.
- राज्यस्तरीय राष्ट्ररत्न पुरस्कार-एशियन कल्चरल सोशल आर्ट लिटरेचर फेडरेशन, मुंबई.
- सन२०१९ च्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे गझल रचनेची निवड
कवितेचा उत्सव
☆ राधा कृष्ण ☆ सौ. मनिषा रायजादे – पाटील ☆
(काव्यमनीषा संग्रहातून)
एकरूप
दोन जीव
देह दोन
एक भाव
कृष्ण राधा
नित्य ध्यास
दोन देह
एक श्वास
अवतरे
जगी प्रीत
समर्पण
हीच रीत
प्रेमांकुर
मनी फुले
राधा वेडी
स्वप्नी झुले
हा दुरावा
प्रीती जरी
दृढ नाती
जन्मांतरी
© सौ.मनिषा रायजादे पाटील
ओंकार निवास, नवजीवन कॉलनी, मिरज, जि-सांगली
फोन नं-9503334279
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈