सौ. विद्या वसंत पराडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ? श्रीमहालक्ष्मी ?☆ सौ. विद्या वसंत पराडकर पुणे

ये ये लक्ष्मी माहेराला

धावून ये ग

भक्तांच्या हाकेला

साद तू घाल ग

 

भाद्रपद मासी अनुराधा नक्षत्री

स्वागत तुझे आम्ही करू ग

ये ये लक्ष्मी माहेराला

धावून ये ग

 

चंदेरी साडी

तुज नेसवू ग

सोनेरी चोळी

तुज लेववू ग

 

सोने मोती अलंकार

तुज चढवू ग

बिंदी कंबर पट्टा, राणीहार

तुज सजवू ग

 

भाद्रपद मासी जेष्ठा नक्षत्री

षोडशोपचारी पूजन तुझे करू ग

ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी

आनंदात भजू ग

 

मळवट शोभे ललाट भारी

पूजू सोळा दूर्वा सोळा पत्री

शोभे फुले गोड गोजिरी

हार तुरयांनी सजवू ग

 

षोडश पदार्थांचा नैवेद्य दाखवू ग

करंजी अनारशाचा फुलोरा करु ग

भाव भक्तीने निरांजन ओवाळू ग

खणा-नारळाने ओटी भरू ग

 

पुढील वर्षीचे निमंत्रण देऊन

लक्ष्मीला निरोप देवू ग

तीन दिवस ब्रम्हानंद पावलो ग

दिवाळी दसरा फिका पडला ग

 

© सौ. विद्या वसंत पराडकर पुणे

१२/९/२०२१।

पुणे.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments