सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सम्पादकीय निवेदन
:: आवाहन ::
आपण देत असलेल्या उत्तम प्रतिसादाबद्द्ल सर्व साहित्यिकांचे मनःपूर्वक आभार! विषयांची विविधता असूनही आपण सर्वजण उत्साहाने लिहीत असता. त्यामुळे भरपूर साहित्य प्राप्त होते. सर्वांना व्यक्त होण्याची संधी मिळावी या हेतूने आम्ही शक्यतो सर्वांचे साहित्य प्रकाशित करण्याचा प्रयत्न करत असतो. पण साहित्याच्या दर्जाबाबत तडजोड करू नये असे आम्हाला वाटते. आपणही या मताशी सहमत असाल.आम्हाला येणा-या अडचणी लक्षात घेऊन आम्ही आपणाला काही सूचना करू ईच्छितो. त्याचा विचार करावा ही विनंती. : : :
- आपले साहित्य पाठवण्यापूर्वी शुद्धलेखन तपासून पहावे.
- आपले साहित्य विशिष्ट दिवशी किंवा त्या दरम्यान यावे यासाठी पुरेश्या कालावधी पूर्वी पाठवावे.पुढील आठ दिवसांचा आराखडा तयार असतो. त्यात ऐन वेळेला बदल करणे शक्य होत नाही. त्यामुळे आपले साहित्य मागे पडू शकते.
- एकाच विषयावर अनेक लेख, कविता आल्यानंतर साधारणपणे प्रथम आलेले साहित्य प्रथम प्रकाशित होईल.
- कोणते साहित्य कोणाकडे पाठवायचे यासंबंधी पूर्वी सूचना दिल्या आहेत. त्यांचे काटेकोरपणे पालन करावे. अन्यथा एका विभागाकडून दुस-या विभागाकडे पाठवण्यात परत वेळ जातो. तसेच एकच साहित्य संपादक मंडळातील सर्वांकडे पाठवू नये, ही विनंती.
- लेखनासाठी आपण मर्यादा ठरवून दिली आहे.साधारणपणे 500 ते 600 शब्दांपर्यत लेख किंवा कथा पूर्ण व्हावी अशी अपेक्षा आहे. एखादा लेख मोठा झाला तर त्याचे योग्य ठिकाणी भाग पाडावेत. पुढचा भाग सुरू करताना पहिल्या भागाचा शेवट जोडून घ्यावा. त्यामुळे वाचताना वाचकाला सलगपणा जाणवेल. तसेच प्रत्येक भागाच्या सुरूवातीला भाग क्रमांक, लेखाचे नाव, प्रत्येक भागाच्या शेवटी लेखकाचे नाव लिहावे. प्रत्येक भाग वेगवेगळा पाठवावा कारण प्रत्येक भाग वेगवेगळ्या दिवशी प्रकाशित होत असतो.
येणा-या अडचणी लक्षात घेऊन या सूचना केल्या आहेत. सर्वांच्या सहकार्याने आपल्याला एक वैशिष्ट्यपूर्ण अंक प्रकाशित करायचा आहे. तरी कोणताही गैरसमज करून घेऊ नये, ही सर्वांना नम्र विनंती.
संपादक मंडळ
ई-अभिव्यक्ती (मराठी)
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈