इंद्रधनुष्य
☆ क्लर्कची हुशारी ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆
कान्ट्रक्टरशी बोलणी झाल्याचे सांगून क्लर्कनी फाईल साहेबांच्या पुढ्यात ठेवली.
साहेबांनी शेरा मारला —-
—-APPROVED
दोन दिवसांनंतर कान्ट्रक्टर दिलेला शब्द पाळायला कानाडोळा करू लागला.
क्लर्कनी ही गोष्ट साहेबांना सांगितली.
साहेब — “ आता काय करायचं ? “
क्लार्क ( स्मितहास्य करत )– “ साहेब फक्त * APPROVED* च्या आधी * NOT * लिहा– बस्स—-
—–NOT APPROVED
आता परेशान होण्याची वेळ होती कान्ट्रक्टरची .
परत क्लर्कशी तडजोड करत क्लर्कला कसंबसं राजी केलं–
क्लर्क परत फाईल घेऊन साहेबांच्या समोर गेला…..
साहेब ( वैतागून ) — “ आता काय करायचं ? “
क्लर्क ( हसत ) — “ साहेब फक्त *NOT* च्या पुढे * E * लिहा म्हणजे झालं —
—-* NOTE APPROVED * बस्स..
साहेब (डोक खाजवत):—( आणि मनात ) — च्यायला मी कसा काय याचा साहेब झालो….! ?
अर्थात आपला देश क्लार्क लोकांच्या अश्या अक्कलहुशारीवर चालत आहे.
?हसत राहा आनंदी राहा ?
संग्राहक – सुश्री मानवी केळकर/श्री माधव केळकर
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈