कवितेचा उत्सव
☆ शंख ☆ सुश्री नीरजा ☆
लहानपणी भातुकली खेळताना
रागाने पहिला डाव मोडून
मी दुसरा डाव मांडला,
तेव्हा तो म्हणाला,
‘तसं कोणाचंच कोणावाचून अडत नाही,
फक्त चालताना पाऊल अडखळलं
तर मागं वळता येत नाही.
चालता चालता आपणच रस्ते पुसून टाकलेले असतात.’
तेव्हा मी म्हटलं,
‘ तोल सावरला की,
पदरात पडलेले शंखही
सुरात फुंकता येतात.’
© नीरजा
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈