कविराज विजय यशवंत सातपुते
☆ अंतरात या. . . . !☆
(प्रस्तुत है कविराज विजय यशवंत सातपुते जी द्वारा रचित काव्य रचना की पृष्ठभूमि पर कवि हृदय की भावपूर्ण कल्पना पर आधारित कविता।)
आयुष्याशी घेतो बोलून
जगणे उसवत जाताना
अंतरात या घडतो आहे
एकेक कविता जगताना. . . . !
एकांताशी करतो सलगी
मनात माझ्या रमताना.
अंतरात या माझे मी पण
पहाट स्वप्ने फुलताना.. . . . !
दैनंदिन गरजांची यमके
जुळवीत जातो घडताना .
अंतरात या सालंकृत मी
काव्य प्रपंची झिजताना.. . . !
सुखदुःखाचे चाळ बांधतो
अनुभव सारे टिपताना .
अंतरात या येतो उमलून
भावभावना सजताना.. . . . !
धगधगत्या जीवनाची गाथा
बाप आठवे रडताना.
अंतरात या एक समर्पण
माय माऊली स्मरताना. . . . !
जबाबदाऱ्यांचे ते कुंपण
या जीवनाच्या परिघाला.
अंतरात या येतो बहरून
ह्रदयसुता ही खुलताना.. . . . .!
© विजय यशवंत सातपुते
100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकार नगर नंबर 2, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 9371319798.
छान रचना सर आपल्या…