श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ राधेमन…. ☆ श्रीशैल चौगुले ☆
(छंदवृत्तः स्त्रग्विनी)
मोर माझ्या मनी नाचता लाज ही
श्रीकृष्णाची जिवा ओढ जी आज ही.
बासरी ऐकता यमुन काठावरी
भानही हरपले विसरुनी साजही.
सांज ही दाटली मन कसे धुंदले
धावले मीच वृंदावनात गुजही.
राधिका भाबडी वेड का शामचे
रासलीला कि प्रेमभक्तभावन सई.
अंतरी नाम ध्यास मुरली धरल हा
तोच सावळ नटखट कृष्ण जो देवही.
© श्रीशैल चौगुले
९६७३०१२०९०
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈