श्री सुहास सोहोनी
इंद्रधनुष्य
☆ पत्त्यांची गंमत ☆ श्री सुहास सोहोनी ☆
पत्ते हे सामान्यतः आयताकृती पातळ पुठ्ठ्याचे किंवा प्लास्टिकचे बनविलेले असतात. बदाम, इस्पिक, किल्वर आणि चौकट, या चार प्रकारात प्रत्येकी १३ पत्ते मिळून ५२ पत्त्यांचा संच होतो.
पत्त्यांची विभागणी एक्का, दुर्री, तिर्री, या क्रमाने दश्शी पर्यन्त, मग गुलाम, राणी, राजा, आणि याशिवाय 2 जोकर असतात.
१) ५२ पत्ते म्हणजे ५२ आठवडे
2) ४ प्रकारचे पत्ते म्हणजे ४ ऋतु. प्रत्येक ऋतूचे १३ आठवडे.
3) या सर्व पत्त्याची बेरीज ३६४
४) एक जोकर धरला तर ३६५ म्हणजे १ वर्ष.
५) 2 जोकर धरले तर ३६६ म्हणजे लीप वर्ष.
६) ५२ पत्यातील १२ चित्रपत्ते म्हणजे १२ महिने
७) लाल आणि काळा रंग म्हणजे दिवस आणि रात्र.
पत्त्यांचा अर्थ समजून घेऊ
१) दुर्री म्हणजे पृथ्वी आणि आकाश
2) तिर्री म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि महेश
3) चौकी म्हणजे चार वेद ( ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद,आणि अथर्ववेद, )
४) पंजी म्हणजे पंच प्राण (प्राण, अपान, व्यान, उदान ,समान)
५) छक्की म्हणजे षड्रिपु (काम ,क्रोध,मद,मोह, मत्सर,लोभ)
६) सत्ती- सात सागर
७) अठ्ठी – आठ सिद्धी
८) नववी- नऊ ग्रह
९) दश्शी – दहा इंद्रिये
१०) गुलाम- मनातील वासना
११) राणी- माया
१२) राजा-सर्वांचा शासक
१३) एक्का- मनुष्याचा विवेक
१४) समोरचा भिडू – प्रारब्ध
पत्त्याचा डाव खेळताना आयुष्याच्या डावाचा अर्थ समजून घेतला तर जगणे नक्कीच सोपे होऊ शकते!!!
संग्राहक : — सुहास सोहोनी
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈