श्री सुहास रघुनाथ पंडित
२४ नोव्हेंबर – संपादकीय
केशव तानाजी मेश्राम.
मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक कवी,कादंबरीकार आणि समीक्षक कै. केशव तानाजी मेश्राम यांचा 24नोव्हेंबर1937 हा जन्मदिन. त्यांनी एम्.ए. केल्यानंतर काही वर्षे पश्चिम रेल्वेत नोकरी केली. त्यानंतर महाड येथील महाविद्यालयात व महर्षी दयानंद महाविद्यालय, मुंबई येथे अध्यापनाचे कार्य केले.
त्यांचे लेखन हे दलित साहित्य,दलित चळवळ,नवलेखक यांना प्रेरणा देणारे होते.ग्रामीण व शहरी दलितांची गुंतागुंत,गुन्हेगारीकडे झुकलेल्या पिढीचे चित्रण असे विविध विषय त्यांच्या साहित्यात दिसून येतात. त्यांनी अनेक समीक्षा ग्रंथ लिहिले आहेत.आस्वादक आणि सामाजिक चिंतन हे त्यांच्या समीक्षेचे वैशिष्ट्य म्हणता येईल.
त्यांच्या विपुल ग्रंथ संपदेपैकी काही —
कथा– धूळ वावटळ
कविता– जुगलबंदी,अकस्मात,उत्खनन,चरित इ.
कादंबरी– पोखरण,हकिकत,जटायू,
लेखसंग्रह — ओलाव्यातले ठसे,छायाबन इ
समीक्षा– समन्वय,शब्दांगण,बहुमुखी,प्रश्नशोध,साहित्य संस्कृती मंथन,साहित्य प्रवर्तन,प्रतिभा स्पंदने इ.
प्राप्त पुरस्कार — म. सा. परिषदेचा डाॅ.भालचंद्र फडके पुरस्कार 2000,
दलित समीक्षा पुरस्कार2000,महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार 2003, शाहूफुले परिवर्तन अकादमी लेखक सन्मान पुरस्कार2003, जीवन गौरव पुरस्कार 2005,
उत्खनन या कवितासंग्रहास कवी केशवसुत पुरस्कार, चरित ला विशेष पुरस्कार,हकिकत आणि जटायू या कादंब-याना ह.ना.आपटे पुरस्कार आणि पोखरण या कादंबरीस विशेष पुरस्कार.
3 डिसेंबर2007 ला त्यांचे कॅन्सरने दुःखद निधन झाले.
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ: विकीपीडिया,महाराष्ट्र नायक,मराठी ग्लोबल व्हिलेज,मिसळपाव,महाराष्ट्र टाईम्स.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈