श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ गुलाम…. ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆
न बोलता उगाच तू रुसून का बसायचे
मनातले कसे बरे तुझ्या मला कळायचे
नकोच मौन पाळणे गिळून राग संपवू
स्मरून काळ मागचा कधी पुन्हा हसायचे
निवारली किती तरी भयाण सर्व वादळे
खचून जायला नको सुखासुखी जगायचे
नशीब रोज सारखे फिरून वाचणे नको
असेल ते मिळेल ना उगाच का झुरायचे
तुला मला हवे तसे जगून दाखवू खरे
धरून ध्यास वेगळा करून काय जायचे
नको मनास वाटले अधांतरी जगायचे
कठीन यातने पुढे कसे तरी झुकायचे
गुलाम होत जायचे रुढी रिती पुढे सदा
बळा पुढे झुकून जात शेवटी मरायचे
© श्री तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈