सुश्री संगीता कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ समई मधील वात ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆
समईतील ती शुभ्र वात
पसरूनी धुक्याची दुलई
पर्वा ना शुभ्र तमाची
मनी तेवते तव आठवणींची समई..
मन समईची वात मंद तेवते
त्यात मी पण जळते
मन सोने उजळता
मन सावळेची होते..
नयनातील काजळी
उगीच मना दुखविते
कोठूनी तो झरोका
आशा-किरण दाखविते…
दाखविते वाट
मनाच्या अंधारात
अंतरंग ते माझे
उगीच मंद हासते..
त्या किरणातूनी आशा
मजकडे पाहते
निराशलेले मन माझे
क्षणभरी आनंदते…!!
© सुश्री संगीता कुलकर्णी
लेखिका /कवयित्री
ठाणे
9870451020
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈