श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ पंखामधले वारे ☆
बंधनात या आकाशाने कुठे ठेवले
सीमांनीही देशांच्या ह्या कुठे रोखले
पल्ला होता खूप लांबचा गाठायाचा
वाऱ्यानेही पंखी माझ्या श्वास ओतले
अंगाला या चाटत होता मूर्ख कोठला
चावट वारा काय करू मी गप्प सोसले
वयात आला अजून नव्हता ऊस तरीही
कुमार होते पाचट त्याने मला छेडले
खेळतात ह्या चंद्रा सोबत खेळ चांदण्या
खेळण्यास मज त्यांनी कोठे मला घेतले
ग्रीष्म ऋतूचा संबध नव्हता येथे काही
शिशिर म्हणाला सांग कशाने रान पेटले
फाटे नाही मीही फोडत तुझ्या सारखे
म्हणून वृक्षा ‘अशोक’ माझे नाव ठेवले
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈