श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ बिंदू… ☆ श्रीशैल चौगुले ☆
आकाश किती विशाल
चांदणे तरी ईवलेसे
पाषाण किती प्रचंड
मुर्तीचे रुप ईतुकेसे.
समुद्र किती अथांग
लहरी परी लहानशा
धरती असे अनंत
सृष्टीची बीजे ईवल्याशा.
कायेचे व्यक्त मोठाले
आत्मजीव असे सूक्ष्मांत
ग्रंथाची पाने कितेक
शब्द-शब्द ज्ञान कोषात.
© श्रीशैल चौगुले
९६७३०१२०९०
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈