सुश्री प्रभा सोनवणे
☆ गज़ल ☆
(वृत्त-मनोरमा)
दूर माझे गाव आहे
चांगले से नाव आहे
हे कुणाला काय ठावे
कुंपणाशी धाव आहे
एवढेही खूप झाले
त्या तिथे ही वाव आहे
काल जे स्वीकारले तू
आज का मज्जाव आहे
भोग माझा वेगळा हा
काळजाशी घाव आहे
सांज झाली का अवेळी
संपलेला डाव आहे
कोळियाला सांग राजा
मासळीला भाव आहे
वल्हवू आता कशी मी
कागदाची नाव आहे
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
धन्यवाद हेमंत सर ?