श्रीमती उज्ज्वला केळकर
२८ डिसेंबर – संपादकीय
महाराष्ट्रातले अव्वल दर्जाचे विचारवंत आणि तत्त्वज्ञ म्हणून ख्यातकीर्त असलेले मे.पुं. रेगे म्हणजेच मेघनाथ पुंडलिक रेगे यांचा जन्म २४ जानेवारी १९२४ साली झाला. मराठी आणि ङ्ग्रजी या दोन्ही भाषेत त्यांनी विपुल लेखन केले. मराठी भाषकांना त्यांनी पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा परिचय करून दिला. विश्वकोशात पाश्चात्य तत्त्वज्ञानविषयक व तत्त्ववेत्ते यांच्या नोंदी त्यांनी केल्या.भारतीय देशने, ग्रीक-पाश्चात्य तत्त्वज्ञान व इतर आनुषंगिक परंपरांचा व्यासंग ही त्यांची वैशिष्ट्ये.
मार्च १९९६मधे मुंबई महानगर साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. यावेळी त्यांनी मराठी भाषा स्थिती आणि भवितव्य या विषयावर मार्मिक भाष्य केले. ज्ञानभाषा म्हणून प्रस्थापित होण्यात नेमका कोणता अडथळा आहे, यांची उत्तम मीमांसा त्यांच्या भाषणात होती.
मे.पुं. रेगे तर्कशास्त्री लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यानंतर १९८४ ब्ते २००० मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष झाले. ते नवभारत आणि न्यू क्वेस्ट या मासिकांचे संपादक होते. ‘मराठी तत्वज्ञान महाकोश या प्रकल्पाच्या संपदक मंडळात होते. त्यांनी गुजरात, औरंगाबाद, मुंबई इये. ठिकाणी अध्यापनाचे काम केले. ‘इंडियन इंस्टिट्यूट ऑफ एज्युकेशन’चे संचालक होते. वाईतील धर्मकोशाचे ते उपाध्यक्ष-अध्यक्ष होते.
१९९५ मधे महाराष्ट्र फाउंडेशनच्या पहिल्या वैचारिक साहित्य पुरस्काराचे ते मानकरी होते.१९९६साली त्यांचा गौरव झाला आणि त्यांना कोकण साहित्य भूषण म्हणून त्यांचा गौरव झाला आणि त्यांना गौरवचिन्ह दिले गेले. मर्मभेद, आधुनीक महाराष्ट्रातील प्रबोधन पर्व विज्ञान आणि श्रद्धा, स्वातंत्र्य आणि न्याय इ. त्यांनी पुस्तके लिहिली. त्यांनी अनेक भाषांतरित पुस्तकेही लिहिली.
☆☆☆☆☆
रमेश सहस्त्रबुद्धे हे विज्ञान कथा लेखक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा जन्म १९३८चा. विज्ञानयुग म्हणून प्रसिद्ध होणार्या मासिकाच्या सल्लागार समितीवर ते होते. त्या अंकात ते लेखनही करत. दै. प्रभातच्या दिवाळी अंकात ते लेखन करत असत. प्रभातने चालवलेल्या ‘ऑल राऊंडर या उपक्रमातदेखील त्यांचा सहभाग असे. मराठी विज्ञान परिषदेतर्फे काढल्या जाणार्या पत्रिकांसाठी त्यांनी लेखन केले. मासिकाच्या संपादकपदाची धूराही त्यांनी सांभाळली. ते लेखक होते, त्याचप्रमाणे आकाशवाणी आणि दूरदर्शन वरूनही त्यांची व्याख्याने प्रासारीत झाली आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे ते पहिले मुख्य जंनसंपर्क आधिकारी होते.
रमेश सहस्त्रबुद्धे यांची ७६ पुस्तके प्रकाशित आहेत. त्यापैकी काही खालील पुस्तके –
- विज्ञान कुतूहल २.प्राणी-पक्षी निरीक्षण, ३.वैज्ञानिक आणि थोरांचे किस्से, ४.अजब दुनिया, ५. ऐतिहासिक नवलकथा, क्रांतिकारकांच्या कथा या बरोबरच त्यांनी मार्कोनी, जगदीशचंद्र बोस, दसगणू महाराज, राजकपूर, होमी भाभा यांच्यावर त्यांनी चरित्रे लिहिली.
- टेलिव्हीजन आणि विज्ञान सागरातील दीपस्तंभ या विज्ञानविषयक पुस्तकांना राज्यापुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या काही लेखांचा पाठ्यपुस्तकात व अभ्यासक्रमात समावेश झाला आहे.
- रोहा येथे झालेल्या विज्ञानपरिषदेच्या संमेलनात मानपत्र देऊन गौरव झाला आहे.
रमेश सहस्त्रबुद्धे यांचा स्मृतीदिन २८ डिसेंबर२०१६ चा तर मे.पुं. रेगे यांचा २८ डिसेंबर २०००चा. या दोघाही विचारवंतांना आणि प्रतिभावंतांना सादर अभिवादन.
☆☆☆☆☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई – अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : इंटरनेट
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈