सौ. स्वाती रामचंद्र कोरे
कवितेचा उत्सव
☆ मी वनवासी… ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆
(शेल काव्य रचना)
जन्मा येताच नकोशी
नकोशी माता पित्याला
सुरू झाला वनवास
वनवास पुजलेला…१
पतीच्या सदनी सुख
सुख स्वप्नी ही न मिळे
सोसताना सारे भोग
भोग शब्दांत ओघळे…२
अन्यायाविरुद्ध ऊभी
ऊभी राहिली माऊली
अनाथांचे पाही दुःख
दुःख सोसण्या धावली..३
ममता बाल सदन
सदन केले स्थापन
गरजूंना अनाथांना
अनाथांना ते अर्पण..४
मी वनवासी म्हणत
म्हणत आयुष्य वेचले
माया ममतेचे छत्र
छत्र आज हरपले…५
तळपत्या उन्हातली
उन्हातली तू सावली
जगायला शिकवले
शिकवले तू माऊली..६
भूक तान्ही असताना
असताना घास गेला
जगणे देणारा श्वास
श्वास पोरका हा झाला..७
© सौ. स्वाती रामचंद्र कोरे
भिवघाट.तालुका, खानापूर,जिल्हा सांगली
मो.9096818972
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈