सुश्री उषा जनार्दन ढगे
चित्रकाव्य
☆ मकर संक्रांत
☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆
१४/०१/२०२२
-उत्तरायण-
नूतनवर्षी होई मकर राशीतून
ऋतूकाळात सूर्याचे संक्रमण
भारतवर्षी कापणीचा हंगाम
साजरा मकरसंक्रांत नामे सण…
सूर्यदेवामुळेच प्रारंभ होतसे
प्रतिदिनी सार्या जीवसृष्टीचा
करूनी आदराने सूर्यनमन
सण हा उपकृत करण्याचा…
घनघोर पानिपत रणसंग्राम
गमावले मावळ्यांनी स्वःप्राण
शोक कारणास्तव या करिती
सणात नारी काळे वस्र परिधान…
तीळगूळात भरूनी सामावतो
गुळाचा प्राकृत खास गोडवा
तीळगूळ घ्या..गोड गोड बोला
मधुवाणीने मनामनांत स्नेह वाढवा…!
© सुश्री उषा जनार्दन ढगे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈