श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ फेरे… ☆ श्रीशैल चौगुले ☆
सारे दैवगतीचे फेरे
प्रारब्धाचे जीवन मृत्यू घेरे.
मना कधी ना गवसती
हातावरच्या रेषा होती
कुठे विसावे नि निवारे
सारे दैवगतीचे फेरे.
कधी कुणा सुख मिळती
कधी कुणा वेळ छळती
भिरभिरे भोगाचे वारे
सारे दैवगतीचे फेरे.
किती केलै सोसले दुःख
आनंदाची शमे ना भुख
जीव आत्म्याची वाट दारे
सारे दैवगतीचे फेरे.
जपले लाख नाही चुकले
भले भले प्राणाशी झुकले
खोटी आशा संकटा सामोरे
सारे दैवगतीचे फेरे.
कुणा मिळते जीवदान
असे बडा तो दैववान
लौकिक आयुष्याचे निखारे
सारे दैवगतीचे फेरे.
© श्रीशैल चौगुले
९६७३०१२०९०
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈