सुश्री नीलांबरी शिर्के
☆
धरतीचे अमर्याद देणे
झाडाचेही तसेच फुलणे
रुप गंध अन सौंदयास्तव
अपुरे पडती नेत्र आपुले
☆
धरतीवर चांदण्या उतरल्या
खेळ खेळता इथेच रमल्या
परत जायचे विसरुन जाता
फुल होऊन वेलीवर सजल्या
☆
नीलांबरी ??शुभ सकाळ
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈