कविराज विजय यशवंत सातपुते
साप्ताहिक स्तम्भ # 112 – विजय साहित्य
☆ अंगणी तुळस ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆
अंगणी तुळस । सौभाग्याचा वास
प्राणवायू खास । वृंदावनी ।।१ ।।
डोलते तुळस । गंधाळते मन ।
आरोग्याचे धन । प्रासादिक ।।२ ।।
तुळशीची पाने । काढा गुणकारी ।
नैवैद्य स्विकारी । नारायण ।।३ ।।
तुळशीचे काष्ठ । वैष्णवांची ठेव ।
नसे चिंता भेव । सानथोरा ।।४ ।।
तुलस पुजन । नित्य कुलाचार ।
असे शास्त्राधार । संवर्धनी ।।५ ।।
अंगणी तुळस । माहेरचा भास ।
सासरचा त्रास । वाऱ्यावरी ।।६ ।।
तेवतसे दीप । परीमळे धूप ।
चैतन्य स्वरूप । मातामयी ।।७ ।।
© कविराज विजय यशवंत सातपुते
मोबाईल 9371319798.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈