श्री रवींद्र सोनावणी
कवितेचा उत्सव
☆ आंधळा ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆
आंधळा होतास मनुजा, आजही तू आंधळा,
पाऊले चंद्रावरीं, पण तू मनाने पांगळा ||धृ||
वास्तवाशी खेळता तू, आंधळी कोशिंबीरी,
अंधश्रद्धा जोजवितो, आपल्या मनमंदीरी,
चालल्या वाटा पुढे, अन तूच मागे चालला ||१ ||
भूवरी ग्रह तारकांची, झेलूनी तू सावली,
धरुनिया वेठीस त्यांना, मांडितो तू कुंडली,
देव दैवा शोधणारा, तू कसा रे वेंधळा?||२||
सोडूनी वाटा रूढींच्या, जाऊ या क्षितिजाकडे,
सप्तपाताळात गाडू , अंधश्रध्देचे मढें,
जोडूनी नाते भ्रमाशी, तू कशाला थांबला?||३||
© श्री रवींद्र सोनावणी
निवास : G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५
मो. क्र.८८५०४६२९९३
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈