श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ मोक्षमंत्र ☆ श्रीशैल चौगुले ☆
तरिही विठ्ठल’ पावतोच
रोज नव्या सूर्योदयात
कितीही झाला सूर्यास्त
क्षितीजात .
विठ्ठल म्हणजे काळी शिवपिंड
कर्मयोगाने भरलेले ब्रम्हांड.
काळोखात दाखवेल रस्ता
जगण्याला ऊजेड
तो काळा पांडुरंग.
कर कटेवर ठेऊन
आशिर्वाद देत ऊभा
पंचमहाभूतास संजीवनी देत.
याकरिताच अनुभवावी
एक तरी वारी
संतांची ओवी कळण्यासाठी
या दशेद्रिंयांची टाळून
प्रदक्षिणा,
आणि नाचावे अभंगात
संतश्लोकांच्या आत्मरंग
रंगवून,चंद्राभागेच्या स्नानात
व्हावे मन शुध्द
गजराचा नाद घुमवीत
टाळ-मृदुंगात
“राम-कृष्ण-हरी”च्या.
© श्रीशैल चौगुले
९६७३०१२०९०
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈