श्रीमती अनुराधा फाटक
कवितेचा उत्सव
☆ कसे? … ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆
कसे देऊ दान तुला
हात माझे रिते रे…
कसे ढाळे अश्रू तरी
नेत्र झाले कोरडे रे…
कशी काढावी समजूत
ओठ माझे बंद रे…
कशी येऊ तुजसमोर
पायी साखळदंड रे…
काय बोलू तुजसवे
शब्द झाले मुके रे…
© श्रीमती अनुराधा फाटक
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈