श्री अशोक श्रीपाद भांबुरे
☆ सुगंधाचा लळा ☆
भेटल्यावर भेटायचे ना कडकडून
घेतलेही असते तुला मी सावरून
मीच वेड्यासारखी का वागते इथे
शिशिरात ही येते अशी मी मोहरून
कंठ फुटला पंख फुटले कोकिळ गातो
मोहराचा गंध येतो झाडावरून
तृप्त तृष्णा ढेकळाची नाही झाली
मेघ गेला फसवून हा दारावरून
एकांताच्या वाटेवर दोघे आपण
जायला पाहिजे होते काही घडून
लागो सुगंधाचा लळा तुला असा की
घेऊन जावीत सुमने माझ्याकडून
एक काटा काय इतका टोचला तुला
आलाच नाही तू पुन्हा मागे फिरून
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈