सौ.मंजुषा सुधीर आफळे
कवितेचा उत्सव
☆ भक्तीगीत. चैत्रा गौरीचे… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆
ये गं, ये गं, चैत्रागौरी,
ये, … ये गं,ये गं चैत्रागौरी
दारी घालिते चैत्रांगण
स्वागताला कोकिल कुजन
सोनियाचा झुला गं देवघरी
नैवेद्याला ठेवते आंबे,डाळी
ये गं, ये गं चैत्रागौरी
भक्तिभावे गं खेळ मांडीला
अत्तराचा सडा शिंपला
चराचरी वसंत सोहळा
प्रेमे वाहते मनमोगरा
ये गं, ये गं चैत्रागौरी
तुजसाठी, हळदी कुंकूराशी
ओवाळीते मी पंचप्राणांसी
ओटी भरण तुझ्या रूपांची
घरी-दारी नांदो सुख शांती
ये गं, ये गं चैत्रा गौरी
ये.. ये गं, ये गं चैत्रागौरी
© सौ.मंजुषा सुधीर आफळे
४/४/२०२२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈