सौ. स्वाती रामचंद्र कोरे
जीवनरंग
☆ अलक (अति लघुकथा) ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆
१.. गणेश विसर्जन
राम काकांच्या घरच्या गणपती चे विसर्जन रहीम चाचांचे टॅक्सीतून हे फिक्सच होते. गेल्या कित्येक वर्षापासूनचा हा रिवाज होता. मात्र गतवर्षीच्या कोरोनाच्या लाटेत रहीम चाचा बळी पडले.
आज विसर्जनाच्या दिवशी दुसऱ्या टॅक्सीवाल्यास काका फोन लावणार, इतक्यात जोरात हॉर्न ऐकू आला. पाहतात तो काय, रहीम चाचांचा मुलगा दारात टॅक्सी घेऊन उभा होता.
२.. नवे घर
एका गळक्या पत्र्याच्या खोलीत राहताना अभ्यासावर मेहनत घेत तिने आई बाबांचे स्वप्न पूर्ण केले. पहिला पगार होताच तिने तो वडिलांच्या हाती दिला. वडील म्हणाले, “ठेव तुझ्याकडेच उद्या तुझ्या प्रपंचास, नवीन घरास होईल” ..डोईवरच्या त्या गळक्या छताकडे पाहिले आणि दुसऱ्या च दिवशी तिने होम लोन साठी अर्ज केला… बाबांच्या नव्या घरासाठी.
अलककारा – सौ. स्वाती रामचंद्र कोरे
भिवघाट.तालुका, खानापूर,जिल्हा सांगली
मो.9096818972