सुश्री संगीता कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ जादू तुझ्या नजरेतील… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆
जादू तुझ्या नजरेतील
मनास स्पर्शूनी गेली
वीण प्रेमाची
अधिक दृढ होऊन गेली..
नकळत नजरेस भरले
खळी तुझ्या गालावरील
अन् मन क्षितिजाच्या पल्याड
जाऊन पोहोचली..
होता तुझा सजलेला
सुंदरसा मुखडा
आस्मांनी बहरलेला
श्रावणसरीचा इंद्रधनू तसा..
रुप तुझे ते बहरले
चढली लाली निळ्याशार सागराला
अस्ताची किरणे फेकीत
सूर्याने निरोप घेतला..
उगवतीचा चंद्र
स्वप्नांची चाहूल देतो
अन् पुन्हा स्पर्शूनी जाते
मनास जादू तुझ्या नजरेतील.. !!
© सुश्री संगीता कुलकर्णी
लेखिका /कवयित्री
ठाणे
9870451020
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈