श्रीमती उज्ज्वला केळकर
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १४ एप्रिल -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी)
विलास सारंग
विलास सारंग यांचा जन्म १९४२चा. नवतेचा आग्रह धरणारे हे मराठी आणि इंग्रजीही लेखक होते. मूळ इंग्रजीत लिहीलेल्या आपल्या अनेक पुस्तकांचे त्यांनी मराठी अनुवाद केले. तसेच मूळ मराठीत लिहीलेल्या आपल्या अनेक पुस्तकांचे त्यांनी इंग्रजीत अनुवाद केले. त्यांची मराठीत ११ व इंग्रजीत ८ पुस्तके आहेत. अनेक संपादित निवडक कथांच्या संग्रहात त्यांच्या कथा आहेत.
आधुनिक परंपरेतील कवी, कथाकार, कादंबरीकार यांच्या साहित्य व्यवहाराची त्यांनी पर्खडपणे चिकित्सा केली आहे. त्यांचे लेख व समीक्षा प्रामुख्याने ‘सत्यकथे’त प्रसिद्ध झाल्या. पुढे ’अभिरुची’, ‘अनुष्टुभ’, ‘नवभारत’ इ. मधूनही त्यांचे लेखन प्रकाशित झाले.
विलास सारंग यांची काही पुस्तके –
१. अमर्याद आहे बुद्ध, २. अक्षरांचा श्रम केला, ३ आतंक ( कथासंग्रह), ४. एन्कीच्या राज्यात, (कादंबरी) ५. कविता (१९६९ ते १९८४ ), ६. घडल्या इतिहासाची वाळू , ७. रुद्र ( कादंबरी), ८. लिहित्या लेखकाचं वाचन (समीक्षा), ९. वाङ्मयीन संस्कृती आणि सामाजिक वास्तव १०. सर्जनशोध आणि लिहिता लेखक – विलास सारंग यांची इंग्रजी पुस्तकेही आहेत. त्यांच्या पुस्तकांच्या नावावरूनच त्यांच्या लेखनातील वेगळेपण जाणवते.
आज विलास सारंग यांचा स्मृतीदिन ( १४ एप्रील २०१५ ) त्यांच्या स्मृतीला सादर वंदन.
☆ ☆ ☆ ☆ ☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈