श्रीमती उज्ज्वला केळकर
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ १७ एप्रिल -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी)
१७ एप्रिल संपादकीय – वि. आ. बुवा.
वि. आ. बुवा यांचा जन्म ४ जुलै १९२६चा. विनोदी लेखक म्हणून ते प्रसिद्ध होते. .१९५० पासून त्यांनी लेखनाला प्रारंभ केला. त्यांची १५० हून अधीक विनोदी पुस्तके आहेत. त्याचबरोबर आकाशवाणीवर अनेक श्रुतिकांचं लेखन त्यांनी केलय. आकाशवाणीवर त्यांचे ६०० पेक्षा जास्त कार्यक्रम झाले. त्यापैकी ‘-पुन्हा प्रपंच’ या कौटुंबिक श्रुतिका मालेचे ४०० पेक्षा जास्त भाग त्यांनी लिहीले आहेत. याशिवाय पटकथा, विनोदी निबंध, तमाशाच्या संहिता, , विडंबने, एकांकिका असे विविध स्वरूपाचे लेखन त्यांनी केलेले आहे.
१९५० मध्ये ‘इंदुकला’ हा हस्तलिखित साहित्याचा अंक त्यांनी प्रकाशित केला होता. त्यात अनेक मान्यवर लेखकांनी लेखन केले आहे. पुढे प्रभाकर पाध्ये यांच्या प्रेरणेने त्यांनी वृत्तपत्रातून लिहावयास सुरुवात केली. सूक्ष्म निरीक्षण शक्ती, कल्पकता, उत्स्फूर्त विनोद ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. अनेक दिवाळी अंकातून त्यांनी लेखन केले. ‘अकलेचे तारे’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९५३ मध्ये प्रकाशित झाला. महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ आणि नाट्य पुरस्कार समित्यांवर ते अनेक वर्षे परीक्षक म्हणून काम बघत होते.
वि. आ. बुवा यांची काही पुस्तके –
१. अकलेचे दिवे, २.असून अडचण नसून खोळंबा, ३. अफाट बाबुराव, ४. इकडे गंगू तिकडे अंबू, ५. खट्याळ काळजात घुसली. ६. झक्कास गोष्टी , ७.फजितीचा सुवर्ण महोत्सव, ८. फिरकी, ९. शूर नवरे, १०. हलकं फुलकं
गिरिजा कीर यांनी आपल्या ‘ दीपगृह’ या पुस्तकात वि.आ. बुवांवर लेख लिहिला आहे.
या हरहुन्नरी लेखकाचा आज स्मृतीदिन ( १७ एप्रिल २०११ ) . त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
☆ ☆ ☆ ☆ ☆
श्रीमती उज्ज्वला केळकर
ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈