श्री सुहास रघुनाथ पंडित
ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २५ एप्रिल -संपादकीय – श्री सुहास रघुनाथ पंडित – ई – अभिव्यक्ती (मराठी)
श्री.विष्णू श्रीधर जोशी.
श्री.विष्णू श्रीधर जोशी हे इतिहास संशोधक आणि लेखक होते.भारतीय स्वातंत्र्य लढा हा दोन मार्गांनी लढला गेला.अहिंसा आणि सशस्त्र क्रांती हे दोन मार्ग.यापैकी सशस्त्र क्रांतीकारकांच्या जीवनकार्याचा विशेष अभ्यास करून श्री.जोशी यांनी त्याविषयी लेखन केले आहे.
शोभा ही त्यांची पहिली कादंबरी.1939साली प्रसिद्ध झाली.परंतू त्या काळात राजकीय आक्षेप घेऊन त्यावर बंदी घालण्यात आली.नंतर 1946 मध्ये ही बंदी उठवण्यात आली.शोभा व्यतिरिक्त त्यांनी पहाटेचे चांदणे,मंगला आणि क्रांतिकल्लोळ या कादंब-या लिहील्या.
- श्री.जोशी यांची अन्य ग्रंथसंपदा:
- मृत्युंजयांचा आत्मतज्ञ (सशस्त्र क्रांतीकारकांवरील चरित्रवजा कादंबरी)
- वडवानल(भगतसिंग,आझाद आदींवर चरित्रात्मक कादंबरी)
- शृंखला खळाळा तुटल्या(नेताजी सुभाषचंद्र कार्य चरित्र)
- कंठस्नान आणि बलिदान(चापेकर बंधू व रानडे)
- अखेर उजाडलं पण देश रक्तबंबाळ
- अग्निपथावरील परागंदा
- दोनशे दोन साहस कथा
- प्रलयातील पिंपळपाने
- आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके चरित्र.
श्री.जोशी यांचे 25/04/2001 रोजी वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले.आज त्यांचा स्मृतीदिन.
त्यांचे स्मृतीस विनम्र अभिवादन!
☆☆☆☆☆
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ : विकिपीडिया
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈