श्री रवींद्र सोनावणी
कवितेचा उत्सव
☆ नंदनवन ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆
तुझे अचानक घडता दर्शन,
मनात फुलते नव नंदनवन ||धृ ||
संगमरवरी स्वप्न मनोहर,
कसे प्रगटलें या अवनीवर?
स्वप्न, सत्य की भास असे हा?
मनांस माझ्या पडतो संभ्रम
ओठांतून मधुकुंभ झिरपती,
कुंदकळया रसगंध उधळती,
कपोलकल्पित नव्हे, सत्य हे,
नयनांतून तव झूरतो श्रावण
गुणगुणता कंठातून वीणा,
सप्त सुरांच्या झुकल्या माना,
अधरांतून अलगुज गुंजता,
वसंतात ये वनवासीं मन
© श्री रवींद्र सोनावणी
निवास : G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५
मो. क्र.८८५०४६२९९३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈