श्रीमती उज्ज्वला केळकर

? ई -अभिव्यक्ती -संवाद ☆ २ मे -संपादकीय – श्रीमती उज्ज्वला केळकर – ई – अभिव्यक्ती (मराठी) ?

दि. के. बेडेकर

दि. के. बेडेकर मराठीत लेखक आणि प्रामुख्याने समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले दि. के. म्हणजे दिनकर केशव बेडेकर यांचा जन्म ८ जून १९१०ला झाला.

दि. के. बेडेकरयांची ग्रंथसंपदा –

१.    अणुयुगातील मनावधर्म

२.    अस्तित्ववादाची ओळख

३.    धर्मचिंतन

४.    धर्म, राष्ट्र आणि समाजवाद

५.    धर्मश्रद्धा एक पुनर्विचार

आज त्यांचा स्मृतीदिन. २ मे १९७३ला त्यांचे निधन झाले.

☆ ☆ ☆ ☆ ☆

रघुनाथ पंडीत

रघुनाथ पंडीत यांचा जन्म कधी झाला, याबद्दल मतभेद आहेत.  जुन्या काळी ज्या संत,  पंत आणि तंत या महत्वाच्या परंपरा होऊन गेल्या, असे मानले जाते, त्यापाकी पंत म्हणजे पंडीत परंपरेतील हे कवी. त्यांचे संस्कृतप्रमाणेच फारसी भाषेवरही प्रभुत्व होते.

रघुनाथ पंडीत यांची काव्यसंपदा –

१. रामदास वर्णन

२. गजेंद्र मोक्ष

३. दमयंती स्वयंवर

यापैकी गजेंद्र मोक्ष आणि दमयंती स्वयंवर ही आख्यान काव्ये खूप गाजली.

रघुनाथ पंडीत शिवाजीच्या काळातले असावेत, असे अनुमान अ. का. प्रियोळकर आणि द.सी. पंगू यांचे अनुमान आहे.

☆ ☆ ☆ ☆ ☆

बाळकृष्ण अनंत भिडे

बाळकृष्ण अनंत भिडे यांचा जन्म रायगड जिल्हयाती किडिम इथे झाला. ते इतिहासकार, कवी आणि समीक्षक होते. त्यांनी बरेचसे गद्य लेखन ‘बी’ या टोपण नावाने केले आहे. ‘बी’ म्हणजे बाळकृष्ण. ते आधी शिक्षक होते. नंतर मुख्याध्यापक झाले.

पदवी मिळवण्यापूर्वीच त्यांनी ‘प्रभाकर’ नावाचे मासिक चालवले होते. १९०८ ते १९११ या काळात ‘ काव्येतिहास’ व ‘खेळगडी या मासिकांचे ते संपादक होते. १९०४ ते १९०९ या काळात त्यांनी ‘काव्यसंग्रह’ मासिकाचे संपादन केले. १९२४ साली त्यांच्या अध्यक्षतेखाली मराठी ग्रंथसंग्रहालयाचा वार्षिक उत्सव झाला. आज आपण या उत्सवाला साहित्य संमेलन म्हणतो.

भिडे यांचे मराठी, इंग्रजी व संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते. ते परखड टीकाकार होते. त्यांच्या चिकित्सक, मार्मिक, व्यासंगपूर्ण टीकात्मक लेखनामुळे मराठी समीक्षा प्रभावी, प्रौढ आणि डौलदार झाली. त्यांचे लेखन, मासिक ‘मनोरंजन’, ‘विविधज्ञानविस्तार’, ’काव्यरत्नागिरी’, ‘रत्नाकर’ इ. दर्जेदार नियतकालिकातून प्रसिद्ध होई. त्यांनी१०८ कविता लिहिल्या. त्यात एकीकडे पंडिती वळण दिसते, तर दुसरीकडे आधुनिक इंग्रजी काव्याची छाप दिसते. मुक्तेश्वर, मोरोपंत, वामन पंडीत, या पंडीत कवींच्या काव्यावर त्यांनी विस्तृत, विवेचनात्मक निबंध लिहिले. साहित्य गुणांना प्राधान्य देऊन त्यांनी ज्ञानेश्वरीची सार्थ व सटीक आवृत्ती काढली आहे. त्यांनी एका लेखात प्राचीन व अर्वाचीन कवींची तूलना केली आहे.

बाळकृष्ण अनंत भिडे यांची ग्रंथसंपदा

१.काव्य आणि काव्योदय – ‘किरण, ‘सुधारक, ’आधुनिक कविपंचक, ‘विरहातरंग’ इ. पुस्तकांवरील परीक्षणे

२. चार वीर मुत्सद्दी – ऑलिव्हर क्रॉमवेल, जॉर्ज वॉशिंग्टन, नेपोलियन बोनापार्ट , शिवाजी यांची चरित्रे

३. प्रभुसंपादन  – (कविता), ४. फुलांचे झेले ( कविता) ५. मराठी कवींचे बोल इ. अनेक पुस्तके त्यांनी लिहीली.

त्यांचे निधन २ मे १९२९ ला झाले.

☆ ☆ ☆ ☆ ☆

शांताराम आठवले.

खेड्यामधले घर कौलारू, जनी नामयाची रंगली कीर्तनी, यमुनाकाठी ताजमहाल, या कातरवेळी पाहिजेस तू जवळी इ. लोकप्रिय गीते लिहिणारे गीतकार शांताराम आठवले यांचा जन्म पुणे येथे २१ जानेवारी १९१० मध्ये झाला.

शालेय जीवनात त्यांनी अनेक नाटके पाहिली. नाट्यसृष्टीशी त्यांचा लहानपणीच जवळून संबंध आला.

ना. ह. आपटे यांच्या ‘मधुकर’ मासिकाचे, त्याचप्रमाणे श्रीनिवास मुद्रणालयाचे सहाय्यक म्हणून त्यांनी काम पाहीले. ना. ह. आपटे यांच्या शिफारसीमूळे त्यांना ‘अमृतमंथन’ या बोलपटात गीत लेखनाचे काम मिळाले. नंतर प्रभात’मध्ये सहाय्य्क म्हणून त्यांनी नोकरी केली. पुढच्या काळात त्यांनी अनेक चित्रपटांसाठी गीते लिहिली व ती लोकप्रियही झाली.

आज दि. के. बेडेकर , रघुनाथ पंडीत, बाळकृष्ण अनंत भिडे, आणि शांताराम आठवले यांचा स्मृतिदिन आहे. त्या निमित्त या चौघांना भावपूर्ण श्रद्धांजली. ? 

☆ ☆ ☆ ☆ ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

ई–अभिव्यक्ती संपादक मंडळ

मराठी विभाग

संदर्भ : साहित्य साधना – कराड शताब्दी दैनंदिनी, गूगल विकिपीडिया

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments