सौ अंजली दिलीप गोखले
जीवनरंग
☆ प्रतिकृती… – भाग 4 ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆
(कथा – प्रतिकृती – विज्ञान कथा या विज्ञान कथेला अखिल भारतीय विज्ञान कथा स्पर्धे मध्ये पारितोषिकाने सन्मानीत केले आहे.)
हे वाचून जॉन ची माहिती आपल्याला कशी मिळणार? कोणाची मदत घ्यावी.? हां !या हॉस्पिटल मधल्या मॅटर्निटी मधले सगळे रिपोर्ट्स पाहायला हवेत. सगळे रेकॉर्ड्स पाहायला हवेत. इतक्या वर्षापूर्वीची माहिती मिळणार का? बघू तरी. म्हणून म्हणून तिने आपला शोध त्या दिशेने सुरू केला. वीस वर्षापूर्वी जन्माला आलेल्या बाळांची नावे, महिन्याचे रेकॉर्ड करत करत अचूक त्या दिवसापाशी ती आली. जॉन चे ना व पाचवे होते. शिवाय त्याच्या नावापुढे चांदणीची खूण केली होती. काय बरे सुचवायचे या चांदणीतून? त्या चांदणीच्या चिन्हाचा शोध घ्यायला तिने सुरुवात केली. त्या इन्स्टिट्यूट मधली अतिशय गुप्त बातमी तिला वाचायला मिळाली. त्या चांदणीची खूण म्हणजे ते बाळ” टिश्यू कल्चर”या नवीन प्रगत पद्धतीतून जन्माला आले. आहे. विशेष म्हणजे त्या बाळाची वाढ आईच्या युटेरस मध्ये नुसती झाली आहे. पण प्रत्यक्ष त्या आईचा, तो जीव निर्माण करण्यात काहीही वाटा नव्हता. फक्त वाढ करायची, त्याचे पालन पोषण करायचे. . नॉर्मल फलन प्रक्रिया इथे घडलीच नाही. टिशू कल्चर या अत्यंत प्रगत प्रक्रियेतून या बाळाचा जन्म झालाय.
त्यावेळी डॉक्टर सु झी हॉस्पिटल मध्ये जॉईन होऊन दोनच वर्षे झाली होती. सु झी ला संशोधनात खूप इंटरेस्ट होता. रोज चे पेशंट तपासत तपासत तिचे निम्मे डोके काहीतरी वेगळे करावे याचाच विचार करत असे. अचानक तिच्या वॉर्डमध्ये एक तरुण, तरतरीत महाराष्ट्रीयन मुलगा बेशुद्ध अवस्थेत ऍडमिट झाला. पाय घसरून पडण्याचे निमित्त झा ले आणि तो बेशुद्ध झाला. तो – आपल्या डॉक्टरेटचा शोध निबंध
वाचण्यासाठी पॉंडेचरी मध्ये आला होता. अन अचानक तिथे अपघात झाला. त्याच्याबरोबर त्याची काळजी घेणारे कोणी नव्हते. डॉक्टर सु झी आणि तिच्या स्टाफ ने त्याची जबाबदारी स्वीकारली. सु झीला त्या तरुणाचा चेहरा खूप आवडला. तिने तरी लग्न न करण्याचे ठरवले होते. याचा चेहरा बघून ती इतकी भूलली की अशा चेह्ऱ्याचा मुलगा किंवा मुलगी आपल्याला असावी म्हणून तरी लग्न करावे असे तिला वाटले. पण तेवढ्यात साठी का त्या बंधनात गुंतायचे? छे छे ! नको. सु झीचे विचार चक्र जोरात फिरायला लागले. टिशू कल्चर च्या मदतीने आपण याच्या सारखे बाळ जन्माला घातले तर? यालाही काहीच कळणार नाही आणि आपली हौस फिटेल. हा आता बेशुद्ध असताना आज आपण त्याच्या शरीरातले टिश्यू प्रिझर्व करू शकू. पुढचे काम कसे करायचे नंतर पाहू आणि खरच सुहास च्या उजव्या दंडातली 5 एमजी टिशू काढून घेऊन दोन स्टिचेस घालून टाकले.
नंतर योग्य ट्रीटमेंट मुळे सुहास लवकर बरा होऊन आपल्या घरी गेला. त्याला काही पत्ताही नव्हता की आपल्या शरीराच्या प्रयोगासाठी अशा तर्हेने वापर झालेला आहे.
सुझीने मात्र नंतर आपल्या डि न ना आपली कल्पना सांगितली. त्या एक्स प्लांटचे इन प्लांटेशन स्वतःचा युटरस मध्ये करू घेऊन आपणच त्याला वाढवणार असल्याचे सांगितले.
सुरुवातीला डिनअशा प्रकारच्या प्रयोगांना परवानगी द्यायला तयार नव्हते. अखेर खूप विचारांती आणि खूप गुप्तता पाळून डॉक्टर सु झिला परवानगी देण्यात आली. सु झी मोठ्या उत्साहाने कामाला लागली. तो टिश्यू तिने कल्चर मेडियम मध्ये त्याचे वाढ केली. पुढच्या योग्य त्या स्टेप्स वापरून छोटीशी सर्जरी करून सु झी च्या युटेरस मध्ये ते इम्प्लांट केले.
पूर्ण नऊ महिने सूझी डॉक्टरांच्या देखरेखी खालीच होती. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी डीन पासून नर्सेस पर्यंत सगळे जातीने लक्ष देत होते आणि अखेर दौंड मुलाच्या जन्मानंतर प्रयोगाची यशस्वी सांगता झाली. सुझीला अगदी हवा तसाच मुलगा झाला. हुबेहूब तिचा तो पेशंट !त्या बाळाचे रीत सर पालकत्व तिने मिळवले. आणि त्याला जीव लावून वाढवले.
मात्र म्हणतात ना, “रक्तातले अनुवंशिक गुण मुलात उतरतात”. इथेही तसेच झाले. हा मुलगा जरी सुझी जवळ पांडेचरीत वाढत होता तरीआवड-निवड सगळी टिपिकल महाराष्ट्रीयन मुलाची होती. त्यात तसूभरही बदल नव्हता. सुझी ने ही त्याच्या आवडीप्रमाणे त्याला वाढवले.
तोच जॉन पॉंडेचरी हून महाराष्ट्रात इंटरव्यू साठी आला होता.
ही सगळी माहिती गोळा करता करता सुखदा चा मेंदू अगदी पुरता शीण होऊन गेला. पण सुहासला ही माहित नसलेले गुपित तिला समजले होते. हा जॉन म्हणजे सुहास चा मुलगा !. म्हणजे तिचाच. पण छे ! याला मुलगा कसा म्हणता येईल? प्रतिकृती !
आपण आरशात कसे आपले प्रतिबिंब पाहतो, कशी हा सुहास ची प्रतिकृती!
सुखदाने घड्याळात पाहिले. बापरे !रात्रीचे नऊ वाजून गेले होते. सगळा दिवस तिचा या संशोधनात गेला. एका नवीन संशोधनाला सुरुवात करण्यापूर्वीच दुसरेच संशोधन नकळत तिच्याकडून झाले होते.
आता हे सगळे सुहासला कसे सांगायचे आणि कसे पटवून द्यायचे याचाच विचार करून ती परत आपल्या केबिन मधून गाडी कडे चालली.
ज्या उत्साहात ती सकाळी आली होती, त्याच उत्साहात पण मोठे गुपित शोधून ती घरी चालली होती. सुहास ला त्याच्या प्रतिकृती ची खबर सांगायला.
समाप्त
© सौ अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈