कवितेचा उत्सव
☆ सांग पोरी सांग सारे… ☆ कवी मनमोहन ☆
(सात मे… कवी मनमोहन स्मृतीदिन)
सांग पोरी सांग सारे,
सांग पोरी सांग सारे
लाजतेस का ? सांग सारे //धृ//
दोन वेण्या तीनपेडी
घालुनी चढलीस माडी
खालि येताना परंतू
मोकळे सारे पिसारे //1//
नीज का ग झोप घेते
पापणीचे लाल पाते
मंद का रात्रीत झाले
कालचे तेजाळ तारे ? //2//
कुंकु भाळी पांगलेले
गाल दोन्ही गुंजलेले
मैत्रिणींशी बोलताना
अंग तूझे का शहारे ?//3//
– कवी मनमोहन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈