डाॅ.ए.पी.कुलकर्णी

? विविधा ?

☆ आंतरराष्ट्रीय रेडक्राॅस दिनानिमित्त – रेडक्रास सोसायटी ☆ डाॅ.ए.पी.कुलकर्णी

कांही वर्षांपूर्वी प्रत्येक रूग्णवाहिकेवर तसेच डाक्टरांचे वाहनांवर रेडक्रास असावयाचा. डाक्टर वा अॕम्ब्युलंस चटकन ओळखता ये असे.

त्याच रेडक्रास बद्दल आज माहिती करून घेऊया.

आज ८मे जागतिक रेडक्रास दिन म्हणून साजरा केला जातो.

रेडक्रास या संस्थेची स्थापना हेन्री ड्युरंट यांनी (१८2८-१९१०)जिनेव्हा येथे केली.

यांची जन्मतारीख ८मे आहे. त्यांच्या स्मृती निमीत्त हा दिवस जागतिक रेडक्रास दिन म्हणुन साजराकेला जातो.

युध्दात जखमी, आजारी सैनिकांना कोणताही भेदभाव न करता योग्य ती मदत करणे हे या संस्थेचे मुख्य काम आहे.

ही संस्था स्थापण्या पुर्वी सुमारे १५८६ मध्ये जखमी सैनिकांना उपचार वा शुश्रूषा करणे साठी (फादर्स आॕफ गुडक्राॕस) स्थापन केली होती. याच सुमारास फ्रान्सचे सत्ताधारी ४थे लुईस यानीही शत्रू सैनिकांना ही चांगली वागणूक द्यावी असा आदेश दिला होता.

रेडक्राॕस संस्था स्थापण्या पूर्वी फ्लाॕरेंस नाईटिंगेल या परिचारिकेने युध्द भुमीवर जाऊन जखमी सैनिकांची सेवा शुश्रूषा केली होती.

२४जून १८५९ ला फ्रेंच व इटाली ही राष्ट्रे आणि आॕस्ट्रिया यांच्या मध्ये युध्द झाले. या युध्दात जवळपास चाळीस हजार सैनिक मृत झाले होते. जखमी सैनिकांची संख्याही खूप होती. जखमी सैनिकांकडे होणारे दुर्लक्ष व अनास्था पाहून हेन्री ड्युरंट खूप दुःखी झाले.

लढाईच्या जवळच्या गावातील चर्च मध्ये तात्पुरते रूग्णालय उभे करून सैनिकाना जमेल तेवढी मदत केली.

सन १८६२ मध्ये या कटू आठवणी लिहल्या. धर्म, जात, पंथ नागरीकत्व यात भेद भाव न करता या पीडीत सैनिकाना कशी मदत करता येईल असा विचार त्यांच्या मनात आला. या विचारांना संपूर्ण युरोप मध्ये अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला.

हेंन्री ड्युरंट व आणखी पाच स्वीस नागरिकानी समिती स्थापन केली.

या समितीसच आंतरराष्ट्रीय रेडक्राॕस समिती असे ओळखू लागले.

या नंतरच्या काळात थोर स्वीस मानवतावादी ड्युरंट हेन्री यानी रेडक्राॕस या संस्थेस संघटीत स्वरूप व स्थैर्य प्राप्त करून दिले म्हणूनच त्याना रेडक्राॕस चळवळीचे जनक मानले जाते.

आॕगष्ट १८६3 वर्षी झालेल्या बैठकीत संस्थेची मूलतत्वे व बोधचिन्ह निश्चित केले.

मूल्ये…

  • दोन्हीही बाजूंच्या सैनिकांची तटस्थ पणे देखभाल करणे.
  • मानवी हालअपेष्ठा कमी करून जीविताचे व आरोग्य रक्षण करणे.
  • परस्परातील सामंजस्याने सहकार्य करून शांतता वाढवणे.
  • देश नागरिकत्व ,धर्म ,लिंग असा भेदभाव न करता मदत करणे.
  • संस्थेची स्वायतत्ता अबाधित राखून ठरावा नुसार काम करणे.
  • कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता काम करणे.
  • एका देशात एकच रेडक्राॕस संस्था देशभर कार्य करेल.
  • जबाबदारीने कर्तव्य पार पाडणे
  • सर्व गरजू लोकाना मदत करणे

बोधचिन्ह …

पांढऱ्या शुभ्र रंगावर तांबडा क्राॕस हे अधिकृत बोध चिन्ह आहे.

अधिकृत बोधचिन्ह असलेल्या वाहने, इमारती, व्यक्ती, यांचेवर हल्ला करूनये, मात्र यांचेकडे दारू गोळा, इतर युध्द जन्य सामान असता कामा नये.

युध्द करणाऱ्या राष्ट्रांमध्ये मध्यस्थ म्हणूनही ही संस्था काम करते.

अण्वस्त्रांवर निर्बंध घालण्यासाठी ही संस्था कार्य करते.

ही संस्था युध्दजन्य परिस्थितीत काम करतेच शिवाय भूकंप, महापूर, वादळ, वणवा, इ.

नैसर्गिक आपत्तीत ही संस्था कार्यरत असते.

१९३ देश याचे सदस्य आहेत. सदस्यांनी रेडक्राॕसचे जिन्हीवा संकेत पाळलेच पाहिजेत व बोधचिन्हही वापरलेच पाहिजे.

ही संस्था सर्वोत्तम परिचारिकेस फ्लाॕरेंस नाईटिंगेल नावाने पदक देते.

भारतीय रेडक्राॕस सोसायटी १९२० ला सुरू झाली.

© डाॅ.ए.पी.कुलकर्णी

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments