विविधा
☆ सापडला की गुलाम…अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆
मी पेपर उघडला,,!!
त्यात मीच दिलेली
जाहिरात होती,,😊
हरवला आहे .. “आनंद “
पत्ता विसरण्याचा त्याला आहे छंद …😊
रंग … दिसेल तो
उंची ..भासेल ती,,😊
कपडे सुखाचे
बटण दुःखाचे,,,!!
कुणाला न सांगता घरातून गेला आहे निघून
थकलो आहोत सगळीकडे शोधून,,,!!
“आनंदा ” परत ये,,,
कुणीही तुझ्यावर रागवणार नाही,,
तुझ्यावर कसलीही सक्ती करणार नाही,,👍
घरातले सगळे आसुसून बघताहेत तुझी वाट
दार उघडं ठेवलंय वाढून ठेवलंय आशेचं ताट,,👍
शोधून आणणाऱ्याला दिलं जाईल इनाम
मग म्हटलं आपणच करावं हे काम,,😊
काय आश्चर्य .. सापडला की गुलाम ..👌😊
एका नव्या कोऱ्या पुस्तकाआड,,
एका जुन्या गाण्याच्या अर्थाच्या पल्याड,,👌
आठवणींच्या मोरपिसात,,
अगरबत्तीच्या मंद वासात,,👌
मोगऱ्याच्या मखमली स्पर्शात …
अवेळी येणाऱ्या पावसात,,👌
त्यानेच मारला पाठीत धप्पा,,
जुन्या मैत्रिणीशी मारताना गप्पा,,😊
मी म्हटलं अरे , इथेच होतास ,उगाच दिली मी जाहिरात
तो म्हणाला वेडे असता तुम्ही माणसं,,😊
बाहेर शोधता .. .मी असतो तुमच्याच मनात … !👌💝🎊
लेखक – अज्ञात
संग्राहिका – सौ. स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈