कवितेचा उत्सव
☆ टिचकी… ☆ अरूण ☆
सकाळ भरभर निघून जाते,
उन्हं सरसर वाढत जातात,
कुठवर आलाय मेसेजचा पक्षी
मनाचे पंख फडफडवीत राहतो,
काळीजडंखही होत राहतो,
जोपर्यंत तुझं अलवार अस्तित्व
उतरत नाही मोबाईलच्या स्क्रीनवर,
मन तरुची पाने सळसळत राहतात,
घड्याळाचे काटे पुढे सरकत राहतात,
अन् प्रतिक्षेच्या सागरलाटा धडकत राहतात पुनःपुन्हा
मोबाईलच्या काचेवर टिचकी मारत…! 😊
साभार – श्री अरुण
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈