सुश्री उषा जनार्दन ढगे
चित्रकाव्य
– सूर संपन्न –
☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆
☆
सप्तसूरांच्या छटा घेऊनी
अवतरला स्वर्गदूत भूवरी
खोल आनंदाच्या डोहात
हर्षतरंगच उमटवी अंतरी..
☆
वाद्यातूनी झंकारिती तारा
दृढ भावनाविष्कार अवतरे
साकारूनी स्वर-लहरींतूनी
गंधर्व हस्तमुद्रित नाद स्वरे..
☆
गीतसूरांतुनी चैतन्य आत्म्यास
दूर मनांतले विषण्ण ते काहूर
कोमल रिषभ धैवत निषाद
व्यक्त करिती अनामिक हूरहूर..
☆
राग स्वर शब्द सूर नि ताल
बध्द रचनेची किती आवर्तने
अथांग महासागर संगीताचा
तृप्त कर्ण मुग्धमधुर झलकीने..!
☆
चित्र साभार – सुश्री उषा जनार्दन ढगे
© सुश्री उषा जनार्दन ढगे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सुंदर