श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ अधांतरी… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

मानस सरोवरीच्या हंसा

जा उडून कुठंतरी

मीच आहे अधांतरी

तुला कसा सांभाळू ?

 

मनीच्या खोपीतल्या सुगरणी

नको बांधू नवे घरटे

नैराश्याचे बोचणारे काटे

तुझ्या घरट्यात अडकतील

अन् घरट्याची नाजूक वीण

विस्कटून विस्कटून जाईल !

 

लावू नकोस कोकीळे

मन जागविण्या पंचम

आघात सोसून सोसून

थंड पडलयं माझं मन !

 

या थंडगार मनात

कसे रहातील

हंस, सुगरण, कोकीळ ?

त्यांच्या मनानं घ्यावी भरारी

मनातून माझ्या जावे अंबरी

मला माहीत आहे

मीच आहे अधांतरी !

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments