श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ तू एक ऋतूचक्र… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

देहात चैत्र सोळा, डोळ्यांत पावसाळा,

लाजेत लाजरा गे, तो थरथरे हिवाळा ||धृ||

 

ऋतुचक्र चालते हे, त्याला तुझा इशारा,

स्पर्शून वाहताना, गंधीत होई वारा,

तुज पाहूनी ऋतुंनी, हा चक्रनेम केला ||१||

 

धारेत श्रावणाच्या, तू नाहताच चिंब,

थेंबागणीक प्रगटे, शितोष्ण सूर्यबिंब,

बघता तुला तयाचा, तो दाह शांत झाला ||२||

 

पानाफुलात झुलती, वेल्हाळ हालचाली,

ती कृष्णरात्र गेली, लावूनी तीट गाली,

तारुण्य पेलवेना, बिंबातल्या नभाला ||३||

 

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments