सुश्री उषा जनार्दन ढगे
चित्रकाव्य
– जपा पर्यावरणाला जपा वसुंधरेला –
☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆
☆
सूर्याभोवती पृथ्वी करितसे भ्रमण
फाटले की हो ओझोनचे आवरण
मानवा जागा हो सांभाळ पर्यावरण
वृथा होईल तुझी प्राणवायूसाठी वणवण…
☆
झाडे तोडूनी जंगले ओसाडली
पर्जन्यराजाने नाराजी व्यक्त केली
मातीने तर आपली कूस बदलली
वार्याने उलट्या दिशेस मान फिरविली…
☆
प्रखर दुपारी झाडांवरी कशी पाखरे गातील ?
गंध घेऊनी झुळूझुळू वारे सांगा कसे वाहतील ?
तार्यांचे ते लुकलुकणें तरी कसे पाहतील ?
पिढीतील लेकरे आपुलीच पुढे काय अनुभवतील..?
☆
धरणीमाय तर तुझ्यासाठी आतुर
नको रे करूस तिचे स्वरुप भेसूर
हाती तुझ्याच आहे,रोख प्रदूषण
कर वृक्ष-संवर्धन तेच अमूल्य भूषण…
☆
मनुजा जागा हो..हो तू शहाणा
नको लावूस बट्टा पर्यावरणाला
राखूनी हिरवं रान निसर्गाचं जतन
सांभाळ रे आपुल्या वसुंधरेला..
☆
चल पृथेस हिरवळीने सजवायाला
चल पृथेस हिरवळीने सजवायाला…!!
☆
चित्र साभार – सुश्री उषा जनार्दन ढगे
© सुश्री उषा जनार्दन ढगे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈