श्रीमती अनुराधा फाटक
कवितेचा उत्सव
☆ दुधावरची साय… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆
दुधावरची साय करपली गेली
आईच्या पदरातली ऊब संपली
वनपीस टीशर्ट, कुडत्यात…
नाही मिळाली जागा तिला
पैशाची नाणी मोजून..
बसविली पाळणाघरात तिला
नोकरी स्टेटस स्वातंत्र्याच्या
त्रिकोणात बंदिस्त झालेली
बालपणीची सावली…
वास्तवाच्या प्रखर उन्हात
नको ते चटके घेत बसली
घरातल्या कोपऱ्यातली आजी
किलकिल्या डोळ्याने बघते
कोरड्या डोळ्यात पाणी
आणण्याचा प्रयत्न करते
त्याचवेळी….
करपलेल्या सायीचा वास
तिच्या नाकात शिरतो
डोळ्यातल्या पाण्याचा थेंब
डोळ्यातच अडकतो…!
© श्रीमती अनुराधा फाटक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
छान! आशय ओळखिचा पण मांडलाय छान!