सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– संत जनाबाई –
☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
संत जनाबाई
तिची सावळी विठाई
तिचा नव्हता तो देव
तिला वाटे तो मानव—-
☆
जनाबाई संगे
विठू गोवऱ्या थापतो
आणि तिच्यासंगे
तो धुणेही धुवतो —–
☆
जनाबाईकडे देव
तिला भेटायला गेला
तिची वाकळ पांघरे
तिथे विसरला शेला—–
☆
जनी संगे देव
दळता दळण
चंद्रहार खुंटीवर
आला विसरून—-
☆
जनीला भेटायला
जाई गोपाळपूराला
बडवे धुंडाळती इथे
गाभारी त्या हरीला—-
☆
अशी जनाबाई
असा पांडुरंग
वेगळीच भक्ती
वेगळाच रंग—-
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈