सौ. अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ भेट☆ संग्रहिका – सौ. अंजली दिलीप गोखले ☆

” राग ” भेटला 

मला पाहून म्हणाला… 

काय राव, आठवण काढत नाही हल्ली ? 

 

मी म्हणालो अरे नुकताच 

” संयम ” पाळलाय घरात 

आणि ” माया ” पण माहेरपणाला 

आली आहे.. 

 

तसं तोंड फिरवून तो निघूनच गेला..!! 

 

पुढे बाजारात ” चिडचिड ” 

उभी दिसली गर्दीत, खरं तर 

ही माझी बालमैत्रीण पण पुढे 

कॉलेजात ” अक्कल ” नावाचा 

मित्र मिळाला आणि हिच्याशी 

संपर्क तुटला..!! 

 

आज मला पाहून म्हणाली, अरे 

” कटकट ” आणि ” वैताग ” 

ची काय खबरबात ? 

 

मी म्हटलं, काही कल्पना नाही बुवा.. 

हल्ली मी ” भक्ती ” बरोबर 

सख्य केलंय त्यामुळे 

“आनंदा”त आहे अगदी..!! 

 

पुढे जवळच्याच बागेत 

” कंटाळा ” झोपा काढताना दिसला 

माझं अन त्याच हाडवैर…. 

अगदी 36 चा आकडा म्हणा ना…. 

त्यामुळे मला साधी ओळख 

दाखवायचाही त्याने चक्क ” आळस ” केला..!! 

मीही मग मुद्दाम ” गडबडी ” कडे 

लिफ्ट मागितली आणि 

तिथून सटकलो..!! 

 

पुढे एका वळणावर ” दुःख ” भेटलं, 

मला पाहताच म्हणालं 

” अरे ये, तुझीच वाट पहात होतो ” 

 

मी म्हणालो, “अरे वाट पहात 

होतास की वाट लावायच्या 

तयारीत होतास? –आणि सर्वात जास्त 

तूच  वाट बघतोस की रे माझी 

” तसं ” लाजून ” ते म्हणालं, 

“अरे मी पाचवीलाच पडलो 

( पाचवीला पुजलो ) तुझ्या वर्गात. 

कसं काय सर्व ? घरचे मजेत ना?” 

 

मी म्हणालो, ” छान ” चाललंय सगळं… 

” श्रद्धा ” आणि ” विश्वास ” 

असे दोन भाडेकरू ठेवलेत घरात 

त्यांच्या मदतीने मस्त चाललंय. 

तू नको ” काळजी ” करूस. 

हे ऐकल्यावर ” ओशाळलं ” 

आणि निघून गेलं..!! 

 

थोडं पुढे गेलो तोच 

” सुख ” लांब उभं दिसलं 

तिथूनच मला खुणावत होतं, 

‘ धावत ये नाहीतर मी चाललो 

मला उशीर होतोय..’  

 

मी म्हणालो, “*अरे कळायला *

*लागल्यापासून तुझ्याच तर मागे *

धावतोय ऊर फुटेपर्यंत, 

*आणि त्यामुळेच आयुष्याची फरपट *

झालीय… एकदा दोनदा भेटलास 

पण ‘ दुःख ‘ आणि ‘ तू ‘ साटलोट  

करून मला एकटं पाडलंत .. दर वेळी. 

आता तूच काय तुझी 

” अपेक्षा ” पण नकोय मला. 

मी शोधलीय माझी ” शांती ” 

आणि घराचं नावच 

” समाधान ” ठेवलंय..!

 

संग्राहिका : अंजली दिलीप गोखले 

मो ८४८२९३९०११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments