सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 145 ?

☆ श्रावण- अष्टाक्षरी चारोळ्या भाग – २ ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

पानाफुलात रमले

आला श्रावण महिना

रिमझिमता पाऊस

हर्ष मनात मावेना

येता श्रावण अंगणी

मला सखी आठवते

मेंदी भरली पावले

डोळे मिटून पहाते

☆ 

झोका बांधला झाडाला

कोणी येता जाता पाही

उंच उंच नेऊ झोका

पर्वा कशाचीच नाही

☆ 

सण नागपंचमीचा

वाटे त्याची अपूर्वाई

 भारी बांगड्याचा सोस

आणि माहेराची आस

☆ 

चित्र नाग नरसोबा

भिंती वर शोभतसे

लाह्या फुटाणे नैवेद्य

घरोघरी मिळतसे

☆ 

बालपणीचा श्रावण

चारोळीत चितारला

तुझ्या आठवांनी सखे

माझा पदर भिजला

☆ 

बेल वाहते शिवाला

श्वेत वस्त्र ते लेवून

 करते मी उपासना

एकवेळच जेवून

☆ 

शिव सावळा तो भोळा

माझा सांबसदाशिव

 असे  श्रावणात माझी

 नित्य मंदिरात धाव

☆ 

दिन स्वातंत्र्याचा येतो

याच श्रावण मासात

 मुक्तता भारतभूची

करू साजरी झोकात 🇮🇳

☆ 

माझा श्रावण मला

बाई किती शिकवतो

रांधा वाढा उष्टी काढा

अर्थ नव्याने कळतो

☆ 

धोत-याचे फूल तसे

किती उपेक्षित असे

महादेवाला परंतू

श्रावणात शोभतसे

☆ 

श्रावणात अन्नपूर्णा

सर्वां प्रसन्नच होते

अन्नदानाची पुण्याई

मग पदरी पडते

☆ 

शुक्रवारी जिवंतिका

 घरी भोजनास येई

पोळी पुरणाची खास  

दूधा तूपा संगे खाई

☆ 

ह्या नारळी पौर्णिमेला

 नारळाचा गोड भात

केशराच्या रंगाचीच

भावा बहिणीची प्रीत

☆ 

पोरी, मंगळागौरीचा

आज आहे गं जागर

झिम्मा फुगडी खेळण्या

तुझा पदर सावर

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments