डॉ. ज्योती गोडबोले
इंद्रधनुष्य
☆ रोड हिप्नोसिस म्हणजे काय..? – डॉ श्रीकांत गुंडावार ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
रोड संमोहन ही एक शारीरिक स्थिती आहे ज्याची बहुतेक चालकांना माहिती नसते. रस्त्यावर वाहन चालवतांना साधारण पणे 2.5 तासांनी रोड हिप्नोसिस सुरू होते. संमोहीत चालकाचे डोळे उघडे असतात, पण मेंदू क्रियाशील राहत नाही आणि डोळा काय पाहतो त्याचे विश्लेषण करत नाही, परिणाम रोड हिप्नोसिस… तुमच्यासमोर उभ्या असलेल्या वाहनाला किंवा ट्रकला मागील बाजूस धडकून अपघात होण्याचे पहिले कारण आहे.
रोड हिप्नोसिस असलेल्या ड्रायव्हरला टक्कर होईपर्यंत शेवटच्या 15 मिनिटांत काहीही आठवत नाही. तो कोणत्या वेगाने जात आहे, किंवा समोरून येणाऱ्या गाडीच्या वेगाचे विश्लेषण करू शकत नाही, सहसा टक्कर 140 किमी पेक्षा जास्त वेगाने असते. रोड हिप्नोसिसपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी दर 2.5 तासांनी चालकाने थांबावे, चहा किंवा कॉफी घ्यावी, थोडी विश्रांती घ्यावी, 5-6 मिनिटे चालावे आणि आपले मन मोकळे ठेवावे. तसेच वाहन चालवताना काही ठिकाणे आणि इतर वाहने लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
जर तुम्हाला वाहन चालवितांना शेवटच्या 15 मिनिटांतील काहीही आठवत नसेल, तर याचा अर्थ तुम्ही स्वत:ला आणि सह प्रवाशांना मृत्यूकडे नेत आहात. रोड संमोहन हे सहसा रात्रीच्या वेळी घडते आणि अशावेळी प्रवासी झोपलेले असतांना परिस्थिती खूप गंभीर होते.
डोळे लागले तर अपघात अटळ आहे, पण डोळे उघडे असतांना मेंदू क्रियाशील असणे अत्यंत महत्त्वाचे आहे… सुरक्षित रहा आणि सुरक्षित वाहन चालवा !!
लेख स्रोत सौजन्य:
डॉ श्रीकांत गुंडावार, रेडिओलॉजिस्ट, पूना.
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈