सौ. विद्या वसंत पराडकर

? कवितेचा उत्सव ?

💐 माझे विद्यामंदिर 💐 सौ. विद्या वसंत पराडकर ☆

(भारतरत्न राष्ट्रपती डॉ राधाकृष्णन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!)

५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना शुभेच्छा

निळ्या पांढऱ्या नभाच्या छायेत,

उत्तुंग विद्यामंदिर उभे आहे,

हात जोडुनी, नम्र वाणीने,

भविष्याचे स्वागत करीत आहे ||

 

भूकाळातील तिचा लाडका,

वर्तमानात अनिमिष नेत्रांनी बघत आहे,

भूतकाळाच्या हिंदोळ्यावर बसून,

आठवणींचे झोके घेत आहे ||

 

या विद्यामंदिराचे दैवत विद्यार्थी,

गुरुवर्य दैवताचे पुजारी आहे,

दैवत प्रसन्न होऊन, प्राध्यापक इंजिनीयर,

शास्त्रज्ञ न्यायाधीश यांचा प्रसाद देत आहे||

 

विद्यारुपी उद्यान विविध रंगांनी रंगले आहे,

विविध गंधरुपी फुले फुलली आहे,

पेरली आहेत महत्त्वाकाक्षेची बीजे येथे,

त्याचे आज डौलडार वृक्षे झाली आहेत ||

 

या विद्यामंदिराने, जीवन शिक्षण दिले,

जणू चौदा विद्यांनी युक्त केले आहे,

उत्तम संस्कारांचे देऊनी लेणे,

माणूस व माणुसकीला जागवले आहे ||

 

भूतकाळाची तंद्री जाऊन वर्तमानात आलो,

कृतार्थ नजरेने तुझे दर्शन घेत आहे,

गतकाळातील अविस्मरणीय स्मृती,

हृदयाच्या शिंपल्यात मोती बनले आहेत ||

 

विद्यामंदिराचा मला, सार्थ अभिमान आहे,

मूल्यवान रत्ने, तिच्यापुढे मला फिकी आहे,

कृतज्ञतेच्या नजरेने आसू जमा झाले आहे,

जीवनाची सार्थकता अंतःकरणात जागृत आहे ||

© सौ विद्या वसंत पराडकर

वारजे पुणे.

ई मेल- [email protected]

मो.नंबर – 91-9225337330 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments