सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ अभंग रचना ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

गौरीच्या नंदना । तू गजवदना ।

सुखवी सर्वांना । दर्शनाने ।।…. १

 

पोटाचे हे दोंद । तिथे रुळे सोंड ।

नाव वक्रतुंड । गजानना ।।…. २

 

मोदक प्रीय तू। लाडू आवडतो ।

मोद तो मिळतो ।आस्वादाने ।।… ३

 

वाहन तुझे ते ।सान मूषकाचे ।

शोभिवंत साचे । दिसे जनी ।।… ४

 

सुंदर गुणांचा । बुद्धीचा तू दाता ।

प्रीयच जगता । तुझी मूर्ती ।।…. ५

 

येतोस या जगी । देतोस आनंद ।

आनंदाचा कंद । गणराय ।।… ६

 

गजानना तुझे । रुप मनोहर ।

तू तारणहार । भक्तप्रिय ।।… ७

 

आगमन तुझे । मोद देई सर्वा ।

आनंदाचा ठेवा । जनांसाठी ।।.. ८

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments