सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
विविधा
☆ सावधानता… भाग ३ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
जमिनीवर रहाणार्या प्राण्यांचे कान हे ध्वनी ग्रहण करण्यास खूपच कार्यक्षम असतात. हरणाच्या बाबतीत सांगायचे तरंतो प्रत्येक कान स्वतंत्रपणे हालवू शकतो. स्थिर किंवा विश्रांतीत असताना देखील प्रत्येक कानाकडून मिळालेल्या ध्वनी लहरीची तुलना करून ते ध्वनीचा स्रोत निश्चित करु शकतात. त्याच्या श्रवण शक्तीची तुलना उपग्रहाशी केली जाते. माकडे , जिराफ, झेब्रे, हे प्राणी समूहाने रहातात. त्यापैकी त्यांचा एक नेता किंवा प्रमुख असतो. तो शत्रूशी सामना करून इतरांचे रक्षण करतो.बाकी सारे त्यांच्या हुकमतीखाली रहातात. त्यांच्या तील सामाजिक वर्तनही उच्च दर्जाचे असते. जंगलात वाघ किंवा सिंह यांची चाहूल लागली की, झाडावरील माकडे विचित्र आवाज काढून त्याची पूर्वसूचना जमिनीवरील प्राण्यांना देतात. बाकीचे प्राणी सावध होऊन पळू लागतात. वाघ किंवा सिंह दुरुन एखादे सावज पक्के करतो. आणि त्याचाच पाठलाग करून ते सावज पकडतो.मग बाकीचे प्राणी पळायचे थांबतात. त्यांना समजत की,आपल्या वरच संकट टळल आहे. शिकार झाली की, तरस हा आयत्या शिकारीवर जगणारा प्राणी सावधानपणे तयारच असतो. एकदा शिकार झाली की, पुन्हा भूक लागेपर्यंत समोरुन प्राणी गेला तरी मारला जात नाही. शिकार कशी करावी, कसे खावे,हे पिल्ले आईकडून शिकतात.
हत्ती हा पृथ्वीवरील सर्वात मोठा व ताकदवान प्राणी. ते कळपाने रहातात. अन्नाच्या शोधात सतत स्थलांतर करीत असतात.आफ्रिकन हत्ती हे भडक डोक्याचे असतात. हत्तीना मुसळधार पावसाची चाहूल सर्वांच्या आधी लागते. दोनशे चाळीस कि. मि.अंतरावरुनही हत्तीना मुसळधार पावसाची चाहूल लागते. आणि ते अचानक आपली दिशा बदलतात.साधारणपणे हत्तीच्या दिशेने वादळी पाऊस येणार असल्याची माहिती वेधशाळेकडून संशोधकांना मिळाली., हे हत्तीचे एक आश्चर्यजनक सावधपणच नव्हे काय?
अस्वल हा प्राणी कधी एक एकटा किंवा दोघे असे रहातात. वेळोवळी ते एकमेकांची जागा व्यापतात. घाबरलेले अस्वल ओरडत नाही तर जमिनीवर आपटत राहून फुत्कार टाकतात. जेव्हा ते रागावतात ,तेव्हा ते खालचा ओठ बाहेर काढून कान मागे सारतात.आणि रागाने एक प्रकारे धमकावतात. बर्याच वेळ मागील दोन पायावर उभे राहून सर्व दिशांना मान फिरवून हुंगत रहातात. संवेदनशील होऊन आपले भक्ष्य पकडतात. आणि संकटही ओळखतात.गेंडा हा प्राणीही जंगलात रहातो. त्याची द्रुष्टी तितकीशी ताकदवान नसते. गेंडा घुसखोरांना हाकलण्यासाठी त्यांच्यामागे पळत रहातो. कधीकधी झाडाझुडुपांवर आपटलाही जातो. ठराविक ठिकाणी तो मूत्र व विष्ठा विसर्जन करून आपले क्षेत्र तो पक्के करतो.दूर कोठे गेला तरी पुन्हा तेथेच येऊन त्याच ठिकाणी तो मूत्र व विष्ठा विसर्जन करतो. आपल्या स्थानाबाबत पक्का जागरुक असतो.कुत्रा हा प्राणी हजारो वर्षांपासून माणसाच्या संपर्कात आहे. तो इमानदार राखणदार आणि शिकारी गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पाळतात.त्याच्या घ्राणेंद्रियांची क्षमता माणसाच्या आठशेपट जास्त असते. त्यामुळे बाँब शोधक पथकातही तो काम करतो. रक्तदाब ,रूदयरोग , मानसिक ताणतणाव अशा व्याधींवर डाँग थेरपी म्हणूनही त्याचा उपयोग केला जातो.त्यासाठी आता अभ्यासक्रम तयार केले आहेत.वैदिक वांग्मयात देखील कुत्र्याचे उल्लेख आहेत. कित्येकदा नको म्हणून दूरवर नेऊन सोडलेले कुत्रे दोन–तीन दिवसांनी परत आपल्या दारी आल्याचे आपण पहातो. अशावेळी त्या सोडणार्या निर्दय माणसाचा राग येतो.केवळ वासाच्या आधारे ते आपले ठिकाण शोधून काढतात. मांजर या प्राण्याबद्दल सांगायचे तर ते इमानदार नसते.पण वासाने त्याला आपली शिकार समजते. आणि जाणीव झाली की , तासनतास ते सावजाची वाट पहात बसते.
क्रमशः…
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈